एक देश एक निवडणूक याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे – प्रा.डॉ.माधव चोले

0
एक देश एक निवडणूक याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे - प्रा.डॉ.माधव चोले

एक देश एक निवडणूक याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे - प्रा.डॉ.माधव चोले

उदगीर (प्रतिनिधी) : आपले एक मत हे खूप अनमोल मत असते. त्यामुळे सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. एक देश एक निवडणूक याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते,अभ्यासक डॉ.माधव चोले यांनी काढले.
ते येथील शिवाजी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संशोधन व विस्तार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक देश एक निवडणूक’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. नवले होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून देगलूर महाविद्यालय ,देगलूर येथील राज्यशास्त्र विभागातील प्रा.डॉ. माधव चोले यांची उपस्थिती होती, याप्रसंगी बोलताना डॉ.माधव चोले म्हणाले की ,”एक देश एक निवडणूक” ही पद्धत वेळ व पैसा बचत करणारी आहे .तसेच वेळोवेळी प्रशासनावर पडणारा ताण कमी करणारी आहे .म्हणून याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे काळाची गरज आहे .असे मत त्यांनी व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. ए एम नवले यांनी लोकशाहीतील निवडणुकीचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.व्ही डी गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.एस. एम .कोनाळे यांनी केले, आभार प्रा.बी.पी.सूर्यवंशी यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *