दोन ऑक्टोबर रोजी विश्वजीत गायकवाड यांचा विजय संकल्प मेळावा

0
दोन ऑक्टोबर रोजी विश्वजीत गायकवाड यांचा विजय संकल्प मेळावा

दोन ऑक्टोबर रोजी विश्वजीत गायकवाड यांचा विजय संकल्प मेळावा

उदगीर (एल पी उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार भाजपचे युवा नेते कार्यक्षम नेतृत्व असलेले विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्या विजयासाठी अविनाश भाऊ गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने जळकोट आणि उदगीर विधानसभा मतदारसंघात सरपंच, कार्यकर्ते यांना जनसंपर्क करत करत अनिल कुमारगायकवाड फाउंडेशन च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सामाजिक शैक्षणिक उपक्रमाच्या संदर्भात माहिती देण्याच्या उद्देशाने विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
विजय संकल्प मेळाव्यामध्ये जळकोट तालुक्यातील सर्व सरपंच हे प्रमुख निमंत्रित आहेत. तसेच वैजनाथ मुंडे पोलीस निरीक्षक जळकोट, किसन धुळशेट्टे, माजी नगराध्यक्ष जळकोट उस्मान मोमीन, माजी नगराध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य जळकोट, संग्राम नामवड नगरसेवक जळकोट, सिद्धार्थ सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते, इसाक पटेल सरपंच मंगरूळ, सादत पटेल माजी सरपंच मंगरूळ, सौ. नंदाताई रमेश धर्माधिकारी माजी उपसभापती पंचायत समिती जळकोट, सुनील भाले सरपंच मंगरूळ, दिलीप सोनकांबळे सरपंच ढोरसांगवी, पंकज शिंदे सरपंच डोंगर कोंनाळी ,ललिताबाई गायकवाड माजी नगरसेवक जळकोट, निलेश गडकर ग्रामपंचायत सदस्य पाटोदा, सुनील नामवाड सरपंच पाटोदा, भुजंग ढवले संदेश पोलीस अकॅडमी जळकोट, सुनीता उमाकांत शिंदे सरपंच डोंगरकोणाळी, दामोदर बोडके सरपंच होकर्णा, अनिल सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते अण्णाराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते, अनिल काळे सामाजिक कार्यकर्ते इत्यादी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून आपण इंजिनीयर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनच्या वतीने राबवलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रमुख कार्यकर्ते आणि फाउंडेशनचे कर्मचारी तसेच विकासाची अपेक्षा ठेवून कार्य करणारे राजकीय क्षेत्रातील सक्रिय असलेले कार्यकर्ते यांचा हा मेळावा ठरणार आहे. या मेळाव्यामध्ये सविस्तर माहिती देणार आहे. या मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांनी विश्वजीत गायकवाड यांच्या विजयासाठी संकल्प करावा, अशी अपेक्षा संयोजकाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
आपण या मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक कार्याची ओळख जनतेला व्हावी, आणि सकारात्मक विकास काय असतो? या मतदारसंघातील सर्वसामान्य माणसाचा आर्थिक कणा मजबूत झाला तरच खऱ्या अर्थाने शाश्वत विकास झाला असे म्हणता येईल. असा विचार करून आपण मतदार संघातील 300 हून अधिक महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण देऊन त्यांना शिलाई मशीनही वाटप केली आहे. तसेच त्यांनी शिवलेल्या पिशव्या फाउंडेशनने स्वतः विकत घेऊन शैक्षणिक क्षेत्रातही एक पाऊल टाकावे म्हणून त्या पिशव्या सोबत शैक्षणिक साहित्य जोडून उदगीर विधानसभा मतदारसंघात 20 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक स्वावलंबनाचे धडे दिले जात आहेत, आणि 300 हून अधिक कुटुंब आज स्वावलंबी झाले आहेत. कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता गेल्या कित्येक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फाउंडेशनच्या वतीने असे अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विश्वजीत गायकवाड यांनी दिली. तसेच दिनांक 2 ऑक्टोबर रोजी बुधवारी दुपारी बारा वाजता गोविंदराज पॅलेस जळकोट येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *