मटका चालवणार्‍या 7 जणांवर लातूर जिल्ह्यातून तडीपार ची कारवाई

0
मटका चालवणार्‍या 7 जणांवर लातूर जिल्ह्यातून तडीपार ची कारवाई

मटका चालवणार्‍या 7 जणांवर लातूर जिल्ह्यातून तडीपार ची कारवाई

लातूर (एल.पी.उगीले) : मटका बंद करा असे सांगूनही पुन्हा पुन्हा आढळून आलेल्या, सात मटका चालवणाऱ्या वर चक्क तडीपरीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे.
लातूर शहरातील व जिल्ह्यातील मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या लोकाविरुद्ध मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करून मटका जुगार चालवणाऱ्या वर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. परंतु काही मटका जुगार चालविणारे लोकांवर वेळोवेळी गुन्हे दाखल करून व प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही त्यांच्यात काहीच सुधारणा होत नाही. ते लपून-छपून मटका जुगार चालवीत असताना परत मिळून आल्याने व त्यांच्या अशा कृत्यामुळे समाजातील गोरगरीब, मजदूर वर्ग झटपट पैसे कमविण्याच्या आमिषाला बळी पडून जुगारांमध्ये पैसे हारल्याने त्यांच्या कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होऊन अनेक जनामध्ये नैराश्य निर्माण होऊन ते व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
काही मटका जुगार चालविणारे लोक त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होऊनही व प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही परत लपून-छपून मटका जुगार चालवीत आहेत. त्यांच्या वर्तनामध्ये काहीच फरक पडत नाही. याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर शहरातील 7 इसमांनावर लातूर जिल्ह्यातून तीन महिन्याकरिता तडीपार (हद्दपार) ची कार्यवाही केली असून यामध्ये संजय भानुदास गायकवाड, (राहणार बौद्ध नगर, लातूर),नागनाथ हरिभाऊ मुंडे, (राहणार मजगे नगर, लातूर),सागर किशोर सरवदे , (राहणार हडको कॉलनी, एमआयडीसी लातूर),बंडू वसंत मादळे, (राहणार बौद्ध नगर, सिद्धार्थ सोसायटी लातूर),खलील शब्बीर शेख, (राहणार अंजली नगर, लातूर),लक्ष्मण आप्पाराव वाघमारे, (राहणार बौद्ध नगर, लातूर), संजय श्रीमंत यादव, राहणार मोती नगर, लातूर.यांचेवर तडीपार (हद्दपार) ची कार्यवाही करण्यात करण्यात आली असून नमूद इसमाना लातूर जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडण्यात आले आहे.
तसेच मटका जुगार खेळविणाऱ्या इतर 20 लोकाविरुद्ध दाखल गुन्ह्याची परिस्थिती पाहता त्यांना सुधारण्यासाठी एक संधी म्हणून मानवीय दृष्टिकोनातून विचार करून त्यांना हद्दपार न करता त्यांच्याकडून सहा महिन्यासाठी प्रतिष्ठित जामीनदारासह चांगल्या वर्तुणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहे.
नमूद लोकाविरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस अमलदार प्रदीप स्वामी, गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे पाठविले होते. त्यावर सदर प्रस्तावांचे अवलोक करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नमुद लोकाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही करून 7 लोकांना लातूर जिल्ह्यातून तीन महिन्यासाठी तडीपार (हद्दपार) केले आहे.
सदर कारवाईच्या माध्यमातून अवैध धंदे चालविणारे लोकांना लातूर जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार) केल्यामुळे अवैध धंद्यांना प्रतिबंध बसणार असून अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला असून अवैध धंदे करणाऱ्यांना जरब बसणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *