शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) यास राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे द्यावे – ॲड निखिल कासनाळे

0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) यास राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे द्यावे - ॲड निखिल कासनाळे

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) यास राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे द्यावे - ॲड निखिल कासनाळे

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना थोर समाजसुधारकांचे नावे देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे त्या अनुषंगाने अहमदपूर जिल्हा लातूर येथिल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी. आय) यास राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे देण्यात यावे ही विनंती एका निवेदनाद्वारे ॲड निखिल कासनाळे यांनी पर्यटन व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी अखंड भारत लाहोर विदयापीठ येथे 1942 मधे वैद्यकीय शिक्षण M.B.B.S. ही पदवी ग्रहण केली तदनंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.त्यांच्या धार्मिक शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्याची कीर्ती महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये पसरली आहे त्यांनी केलेले कार्य आजही लोकांच्या हृदयात अजरामर आहेत.
वयाच्या 104 व्या वर्षापर्यंत महाराजांनी मोफत वैद्यकीय सेवा पुरविली तसेच समाजप्रबोधन अध्यात्मिक,व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, रक्तदान, अवयवदान या कार्यात सक्रिय योगदान देऊन राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य केले.
अशाच राष्ट्रीय कार्यामुळे कोणतेही पद न भूषविले असताना देखिल त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा अंत्यसंस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय इतमामात करण्यात आला.
आमच्या भागातील अशा या महान महापुरुषाचे नाव अहमदपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी.आय) यास देऊन त्यांना सन्मानित करावे ही विनंती ॲड निखिल कासनाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *