डॉ. अनिल कांबळे यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारीची हलचाल! आघाडीत चलबिचल !!

0
डॉ. अनिल कांबळे यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारीची हलचाल! आघाडीत चलबिचल !!

डॉ. अनिल कांबळे यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारीची हलचाल! आघाडीत चलबिचल !!

उदगीर (ॲड. एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदार संघातील राजकीय वारे आता हळूहळू तापू लागले आहे. एकूण वातावरण महाविकास आघाडीला पोषक आहे. असे चित्र दिसताच महाविकास आघाडीतील तुतारीकडे मोठ्या प्रमाणात तरुण कार्यकर्त्यांसह नेत्यांचाही ओढा लागला आहे. यात प्रामुख्याने उदगीर शहराचे उपनगर समजल्या जाणाऱ्या शेल्हाल येथील प्रचंड जनसंपर्क असलेले नेते डॉ. अनिल सदाशिवराव कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आपल्याला उदगीर विधानसभेची उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या त्यांच्या भूमिकेमुळे उदगीरच्या राजकारणातील गणिते बिघडून गेले आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
कारण फक्त पंधरा दिवसाचा वेळ असताना 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षातून उमेदवारी मिळवली होती, आणि जवळपास 73 हजार मतदान घेऊन त्यांनी आपली लोकप्रियता दाखवली होती. मात्र हे जर एकदा निवडून आले तर कायम या ठिकाणी त्यांचेच वर्चस्व राहील, अशी भूमिका घेतलेल्या भारतीय जनता पक्षाच्या काही स्वार्थी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ” नवरा मेला तरी हरकत नाही, सवत रांडव झाली पाहिजे” अशी भूमिका घेत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तरी चालेल पण डॉ. अनिल कांबळे या ठिकाणी कायम प्रभावशाली राहतील असे होऊ नये. असा स्वार्थी आणि क्षणिक विचार करून भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान केले, तसेच डॉ. अनिल कांबळे यांचेही मोठे नुकसान झाले. डॉ. अनिल कांबळे हे लोकप्रिय तर आहेतच आहेत, परंतु मराठवाड्यामध्ये त्यांनी आपल्या अबोली हॉस्पिटलच्या माध्यमातून जी सेवा दिलेली आहे, ती उल्लेखनीय आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये एम.बी.बी.एस., एम.डी. (मेडिसिन) असे उच्च विद्याभूषित असलेले डॉ. अनिल कांबळे यांना जेव्हा भारतीय जनता पक्षाने आपल्याला धोका दिला हे लक्षात आले तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकला. आणि मध्यंतरी काही काळ ते शांत होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या नंतर महाविकास आघाडीकडे सर्वसामान्य माणसांचा आणि मतदारांचा कल आहे, हे लक्षात येताच उदगीर विधानसभा मतदारसंघात असलेला त्यांचा वाढलेला प्रभाव आणि जनसंपर्क त्यात शरदचंद्र पवार यांच्या विचाराला मानणारा मोठा वर्ग याची सांगड घालून जर आपण निवडणूक लढवली तर विजयश्री सहज खेचून आणू शकतो. असा विश्वास निर्माण झाल्याने त्यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीवर दावा ठोकला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मी, मी म्हणणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
समाजसेवेतून राजकारण करावे या भूमिकेतून त्यांनी वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणात केली आहे. अनेक गोरगरिबांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. “गरीबों का मसीहा” अशी त्यांची झालेली ओळख हीच त्यांची समाजसेवा स्पष्ट करून सांगते. त्यांची ही लोकप्रियता आणि सामाजिक कार्य विचारात घेऊन भारतीय जनता पक्षाने ऐनवेळेला त्यांना संधी दिली होती. मात्र कर्म दरिद्री कार्यकर्ते आणि मुठभर नेते यांना अनिल कांबळे हे परवडणार नाहीत असे वाटल्यामुळे ठरवून त्यांचा पराभव केला गेला, असे आता कार्यकर्ते स्पष्टपणे बोलू लागले आहेत.
आजपर्यंत डॉ. अनिल कांबळे हे भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र पातळीवरून कार्य करणारे सदस्य होते, तसेच भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय प्रकाश सेलचे अध्यक्ष म्हणून होते. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले होते, त्यासोबतच सामाजिक संघटनामध्ये विभागीय अध्यक्ष लायन्स क्लब परभणी, अध्यक्ष क्वीन क्लब परभणी, अध्यक्ष अबोली चॅरिटेबल ट्रस्ट परभणी, वाहतूक नियंत्रण क्लब सदस्य परभणी पोलीस आणि उदगीर विधानसभा निवडणूक 2091 मधून भाजपचे उमेदवार अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे.
आजही ते नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया या अत्यंत प्रतिष्ठेच्या समितीवर संचालक म्हणून कार्य करत आहेत. यातून जशी त्यांची कार्यक्षमता दिसून येते, तशीच त्यांच्या कार्याची महतीही स्पष्ट होते.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कार्य करत असताना शिक्षक संघटना, आरक्षण बचाव कृती समिती मित्र मंडळ, नगर विकास कृती समिती यांच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले आहे. यासोबतच कुटुंब नियोजन कार्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. आपल्या समाजातील गोरगरीब जनतेला मदत करावी, या भावनेने मातंग समाज वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करून अनेक गोरगरिबांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण कसे निर्माण होतील? या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत.
दीन दलित, अत्यंत गरिबीचे जीवन जगणारे जे लाभार्थी असतील त्यांना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सवलत मिळवून देण्याच्या कामी देखील त्यांनी केलेले कार्य आजही लोक आवर्जून उल्लेख करतात. सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याचा भाग म्हणून वृक्षारोपण असेल किंवा गोरगरिबांसाठी मोफत संपूर्ण रोग निदान शिबिरे, रक्तदान शिबिरांचे आयोजन असेल त्यामध्ये सदैव डॉ. अनिल कांबळे यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये. या उद्देशाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याच्या दृष्टीने त्यांनी अर्थसाह्य केलेले आहे. शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेले आहे.
इतकेच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर पराभूत झालेला उमेदवार सहजासहजी पुणे मतदारसघाकडे फिरकत नाही , मात्र त्याला डॉक्टर अनिल कांबळे हे पूर्णपणे अपवाद आहेत. आपला निसटता झालेला पराभव याचे आत्मपरीक्षण करत त्यांनी कोविड 19 च्या काळामध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघातील जे गरजू लोक होते त्यांना अन्नधान्याचे कीट वाटप करून आपले सामाजिक दायित्व सिद्ध करून दाखवले आहे. अशा या लोकप्रिय नेत्याबद्दल लोकांच्या मनात आजही आदराची भावना आहे. या भावनेची कदर करून लोक निश्चितपणे त्यांना विजयी करतील, असा विश्वास पक्ष श्रेष्ठींना सुद्धा वाटू लागला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तातडीने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश या पदावर त्यांची नियुक्ती केली आहे. यावरूनच त्यांच्या एकूण सामाजिक आणि राजकीय कार्याची पावती सिद्ध होते. कारण पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तम रीतीने करून पक्ष मजबूत करण्यासाठी ते सक्षम आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख पंडित प्रल्हाद कांबळे यांना वाटते, त्यांना विश्वास आहे. आणि त्या विश्वासामुळेच डॉक्टर अनिल कांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ही संघटना बांधणीसाठी उत्तमरीत्या कार्य करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व शक्तीनिशी योगदान देतील असा विश्वास त्यांनी नियुक्ती पत्रामध्ये व्यक्त केला आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षांची ध्येयधोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळातील नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. अनिल कांबळे हे सक्षम आणि पूर्ण ताकतीने काम करू शकतील असा विश्वासही सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख पंडित प्रल्हाद कांबळे यांनी व्यक्त केला आहे. पक्षश्रेष्ठतील मान्यवरांना त्यांच्याबद्दल वाटणारा विश्वास म्हणजेच उदगीर विधानसभा मतदारसंघातून ते विजयश्री खेचून आणू शकतात, असाच अंदाज राजकीय विश्लेषकांनी त्यांना दिला असावा. अशी खात्री वाटायला लागते. आणि त्यामुळेच त्यांचा हा पवित्रा राजकारणातील मातब्बरांना सुद्धा हादरवून टाकणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *