हिंदी भाषेमध्ये जागतिक दर्जाचे साहित्य – डॉ. अभिमन्यू पाटील

0
हिंदी भाषेमध्ये जागतिक दर्जाचे साहित्य - डॉ. अभिमन्यू पाटील

हिंदी भाषेमध्ये जागतिक दर्जाचे साहित्य - डॉ. अभिमन्यू पाटील

उदगीर (प्रतिनिधी) : हिंदी ही भारताची राजभाषा आहे. हिंदीला संविधानामध्ये जरी राजभाषेचा दर्जा दिला असला तरी भारतीय लोकांच्या हृदयामध्ये ती राष्ट्रभाषा म्हणून विराजमान आहे. हिंदी ही खऱ्या अर्थाने भारताची प्रमुख भाषा असून तिचा प्रवास आता जागतिक भाषेच्या दिशेने सुरू आहे. हिंदी ही अतिशय समृद्ध भाषा असून हिंदी भाषेमध्ये जागतिक दर्जाचे साहित्य आहे, असे मत डॉ. अभिमन्यू पाटील यांनी व्यक्त केले. ते शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथे हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.टी. शिंदे तर प्रमुख उपस्थितांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. नवले, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. व्ही. के. भालेराव, प्रा. बालाजी सूर्यवंशी, डॉ. प्रणिता पाटील, प्रा. सविता साळवे इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. अभिमन्यू पाटील यांनी हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी यावेळी हिंदी भाषेमध्ये रोजगाराच्या अपार संधी असल्याचे व्यक्त करून विद्यार्थ्यांनी विविध भाषिक कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. डॉ. ए. एम. नवले यांनी हिंदी ही अतिशय कोमल, मृदू भाषा असून ती जगातली चौथी सर्वात मोठी भाषा असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या साहित्य दर्पण या भित्तिपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर व्ही के भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मनियार अल्फिया व सूर्यकर वैष्णवी या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना हिंदीचे महत्त्व स्पष्ट केले. मणियार सबाहत हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर माटेकर मैथिली हिने उपस्थितांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. व्ही. डी. गायकवाड, डॉ. एस. एम. कोनाळे, डॉ. सी. जे. देशमुख, प्रा.दिपाली शेळके, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!