कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी (तांडा) उदगीर येथील पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट यशस्वीरीत्या संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : कृषि महाविद्यालयाच्या वतीने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये बी.एस.सी (मानद) कृषी पदवी अभ्यासक्रमात प्रवेशित पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट लातूर येथील मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, गळीतधान्य संशोधन केंद्र, कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना कृषि विषयाविषयी विविध कार्य प्रणाली तसेच कृषि आधारावरील विविध संस्था यांचे ज्ञान मिळवण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. सिक्स्थ डीन्स रिपोर्ट नुसार असलेल्या दिक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत ही शैक्षणिक भेट करण्यात आली आहे.
या अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनी लातूर येथील मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, गळीत धान्य संशोधन केंद्र आणि विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय येथे भेट देऊन तेथील विविध विभागांची माहिती घेतली.
कृषि विज्ञान केंद्र, लातूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सचिन दिग्रसे व विस्तार शिक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ प्रा. सतीश बेद्रे यांनी कृषि विज्ञान केंद्राची कार्यप्रणाली व भुमिका तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेले ऊस व सोयाबीन या पिकांबद्दल सविस्तर माहिती दिली.
तसेच अभियांत्रिकी विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. सचिन शिंदे यांनी बियाणे उगवण क्षमता, ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवले. तसेच अत्याधुनिक बियाणे परीक्षण प्रयोगशाळेबद्दल विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
प्रा. अंजली गुंजाळ यांनी मूल्यवर्धित उत्पादने जसे की, सोयाबीन पासून बनवलेल्या सोयामिल्क, टोफू तसेच मोरींगा पावडर, कांदा फ्लेक्स बद्दल सविस्तर माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्याना दिले.
तसेच डाळ प्रक्रियेबद्दल माहिती दिली.
गळीतधान्य संशोधन केंद्र, लातूर येथील डॉ. मोहन धुप्पे, डॉ. घोटमुकळे यांनी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित केलेल्या, सूर्यफूल, भुईमूग पिकांच्या वाणांची माहिती दिली तसेच डॉ. शिवशंकर पोले यांनी या पिकांची प्रक्षेत्रावर माहिती दिली.
ही शैक्षणिक भेट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल नंदीग्राम कृषी एवंम ग्रामविकास संस्था, सुगांव चे सचिव मा. श्री. गंगाधरराव जी दापकेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच ही शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी (तांडा) उदगीरचे प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उप-प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, डिडिओ डॉ. आनंद दापकेकर, डॉ. शेख वसीम, प्रा. विशाल सोमवंशी , डॉ. दिपाली कोकाटे यांनी अथक परिश्रम घेतले.