उदगीर मध्ये बॉडी मसाज च्या नावाखाली चालणाऱ्या कुंठणखण्यावर धाड, गुन्हा दाखल

0
उदगीर मध्ये बॉडी मसाज च्या नावाखाली चालणाऱ्या कुंठणखण्यावर धाड, गुन्हा दाखल

उदगीर मध्ये बॉडी मसाज च्या नावाखाली चालणाऱ्या कुंठणखण्यावर धाड, गुन्हा दाखल

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील भर वस्तीत देगलूर रोडवर एका पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये स्पा सेंटर अँड बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली चक्क वेश्याव्यवसाय चालू असल्या संदर्भात गुप्त बातमीदारांनी पोलिसांच्या विशेष पथकाला आणि पोलीस अधीक्षकांच्या पथकाला माहिती दिली होती. त्या माहितीची शहानिशा करून गुरुवारी पहाटे या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणी तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, देगलूर रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाजूला एका इमारतीमध्ये द बेला स्पा अँड बॉडी मसाज सेंटर अशा पद्धतीचा बोर्ड होता. मात्र त्या ठिकाणी बॉडी मसाजच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याचे परिसरातील लोकांच्या निदर्शनास आलेली बाब, कोणीतरी पोलिसांच्या खबऱ्याला दिली. त्यानुसार ही गुप्त बातमी पोलिसांना समजली. त्यावरून लातूर येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी धाड टाकली. यावेळी महिलांना पैशाचे आमिष देऊन देह व्यापारास प्रवृत्त करण्यात आले असल्याचे आढळून आले. याप्रकरणी संपत भगवान खुणे, गोपाळ माने (रा. लातूर) आणि किरण संदिपान शिंदे (रा. तांबवा तालुका केज) या तिघांच्या विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यास गुरुवारी पहाटे कलम 143, 3 (5) बी एन एस सह कलम 3,4,5,7 अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 प्रमाणे फिर्यादी आयुब गफूर साब शेख, दहशतवाद विरोधी शाखा लातूर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी स्वतःच्या आर्थिक फायदा करता आर्थिक दृष्ट्या पीडित असलेल्या महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करत असल्याचे आढळून आले. तसेच आरोपी क्रमांक एक व दोन यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता कुंटणखाना चालवण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली. वास्तविक पाहता या घटनास्थळाच्या आजूबाजूला दवाखाना, मार्केट आहेत. याचेही भान संबंधितांनी ठेवले नाही. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे करत आहेत.

या प्रकरणातील पीडित महिलाना उदगीर येथील न्यायालयात रात्रीउशिरा हजर केले असता, त्यांना लातूर येथील महिला सुधार गृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले,त्या प्रमाणे त्यांची रवानगी करण्यात आली.आणखी काही महिलांचे लैंगिक शोषण होत होते का ? याचा शोध घेतला जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *