महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ व संत मुक्ताबाई यांची जयंती साजरी

0
महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ व संत मुक्ताबाई यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ व संत मुक्ताबाई यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याची प्रणेते, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ व संत मुक्ताबाई यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक व लेखक तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व संत मुक्ताबाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान तसेच संत कवयत्री मुक्ताबाई यांच्या साहित्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रमाधिकारी डॉ. बी .के . मोरे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागाचे सदस्य प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. नागराज मुळे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. डी. एन. माने, डॉ.सचिन गर्जे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!