आईच्या सुसंस्कारातच भारताच भविष्य – प्रा.मारोती बुद्रुक पाटील
मशाल रणयौध्याचा सन्मान सोहळा
अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षणाबरोबरच संस्कार,चारित्र्य आणि शौर्याचा ऐतिहासिक ठेवा आईने बालकांच्या मनात रुजवावा,भारताचा भविष्य आईच्या सुसंस्कारतच आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते,प्रख्यात निवेदक,प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
उन्नी ता. अहमदपूर येथल शंभुराजे नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन व मशाल धारकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
सुसंस्काराला पोरखी झाली पिढी या विषयावर प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते.
पुढे बोलातांना ते म्हणाले की इतिहासकालीन आठवणी आणि स्मृती जोपासून संत महात्मे व महापुरुषांचा इतिहास आणि कार्यातून प्रेरणा आजच्या युवकांनी घ्यायला हवी महापुरुषांच्या व संत महात्म्यांच्या,देवी देवतांच्या प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा महापुरुषांचा इतिहास युवकांनी आपल्या डोक्यात घ्यावा.शिवरायांनी स्वतःच्या शिवकालीन व्यवस्थापनामध्ये स्त्रियांचा आदर सन्मान, कडक शिक्षा,शत्रूपासून सावधपणा,रयतेच्या रक्षणासाठी गडकोट किल्ले,शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आरमार,शेतीसाठी पाणी व्यवस्थापन हे सर्व फक्त शिवबाने केले.विश्वात शिवरायांच्या जीवन चरित्रा सारखे दुसरे चरित्र अजूनही वाचायला मिळत नाही.हिमालयासारखा तेजस्वी शिवरायांचा इतिहास युवकांनी आपल्या डोक्यात घेतला तर येणाऱ्या भविष्यकाळात परत सुराज्य निर्माण करता येईल परंतु आजची तरुण पिढी व्यसनाधीन होऊन संस्कारहीन होत चालली आहे.आई-वडिलांनी बालवयातच मुलावर जिजाऊ माँ सारखे संस्कार करावे लागतील तरच घरात शिवबा जन्माला येईल असे प्रतिपादन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
यावेळी तुळजापूर ते उन्नी पायी पदयात्रा मशाल घेऊन येणाऱ्या युवकांचा इंजिनीयर विष्णू आडाव यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.अजय गंगथडे,शिवशंकर आडाव,माधव केरले यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम आडाव,तुकाराम केरले,दिपक गंगथडे,माधव जाधव ,श्याम चोथवे सह चाळीस रणयौध्याचा सन्मान करण्यात आला.