नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘एआय’ उपयुक्त – डॉ. राजेश कुलकर्णी

0
नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'एआय' उपयुक्त - डॉ. राजेश कुलकर्णी

नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'एआय' उपयुक्त - डॉ. राजेश कुलकर्णी

अहमदपूर (गोविंद काळे) : आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात ‘ एआय’ हा आजच्या माहिती तंत्रज्ञान युगाचा महामंत्र असून, नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी भारत सरकारने स्वीकारलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘एआय ‘ हे अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन हैदराबाद, तेलंगणा येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माहिती तंत्रज्ञानाचे अभ्यासक, संशोधक डॉ. राजेश कुलकर्णी यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात ‘ जेनेरिटीव्ह ए.आय. इन हायर एज्युकेशन अँड रिसर्च : अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस’ या विषयावर आयोजित केलेल्या एक दिवसीय, आंतर विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बीज भाषक म्हणून डॉ. राजेश कुलकर्णी हे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांची रुची वाढविण्यासाठी ए आय उपयुक्त आहे. संशोधनाच्या क्षेत्रातही ‘ एआय’ तंत्रज्ञानाने क्रांती केली असून, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविताना ‘एआय’ च्या माध्यमातून विविध प्रयोग केले तर विद्यार्थ्यांची वर्गातील संख्या निश्चित वाढेल असेही ते यावेळी म्हणाले.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर तर उद्घाटक म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव हिरागीर सिद्धगीर गिरी हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.टी. शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, कार्यकारणी सदस्य ज्ञानदेव झोडगे गुरुजी, रामराव एकंबे यांच्यासह पृथ्वीराज पाटील एकंबेकर, पुंडलिकराव पाटील, राष्ट्रीय चर्चासत्राचे मुख्य संयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, समन्वयक डॉ. बब्रुवान मोरे, सहसमन्वयक डॉ. सतीश ससाणे, शोध निबंध वाचन सत्राचे अध्यक्ष हैदराबाद येथील डॉ. कृष्ण प्रसाद उपस्थित होते.
चर्चासत्राच्या सुरुवातीला आपल्या भाषणात महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी उपस्थितांना संस्थेच्या व महाविद्यालयाच्या कार्याची ओळख करून दिली. तसेच चर्चासत्राच्या विषयाचे महत्त्व स्पष्ट करून चर्चासत्राच्या संयोजना मागील उद्दिष्टांची माहिती दिली. तसेच अध्यक्षांच्या वतीने पृथ्वीराज पाटील एकंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. जगाच्या बरोबर चालायचे असेल तर ‘एआय’ सारखे नवे बदल स्वीकारले पाहिजेत; मात्र यंत्राच्या अतिवापरामुळे आपल्या बुद्धीला गंज चढणार नाही याची खबरदारीही घेतली पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शोधनिबंध लेखसंग्रहाच्या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी शंभर पेक्षा अधिक संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध पाठवले होते. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. किरण गुट्टे यांनी केले तर सर्वांचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले. या राष्ट्रीय चर्चासत्रास महाराष्ट्र तसेच देशभरातील विविध महाविद्यालयांतून प्राध्यापक, शोधनिबंध लेखक, विद्यार्थी, संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *