मन्याड नदी पात्रात बुडून दोन युवकांचा जागीच मृत्यु
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शेनकुड येथील मन्याड नदी पात्रावर बांधण्यात आलेल्या पुलाच्या बाजुला नदी पात्रात तीन युवक दि ०६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते साडे चारच्या दरम्यान पोहण्यास गेले असता त्यातील दोन युवकांचा नदीपात्रात खोदण्यात आलेल्या खोल खड्यांचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून जागीच मृत्यु झाला असल्याची घटना घडली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी कि , अहमदपूर तालुक्यातील शेनकुड येथील मन्याड नदी पात्रात बांधण्यात आलेल्या पुलाच्या बाजुला मन्याड नदी पात्रात अनिल बबन नागरगोजे वय १७ वर्ष रा टाकळगाव ( शेनकुड ) ता अहमदपूर तुषार दत्ताराव पवार रा धसवाडी ता अहमदपूर व इतर एक मित्र राहणार हल्ली मु भाग्य नगर हे तीन युवक मन्याड नदी पात्रात दि ०६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान पोहण्यास गेले होते परंतु ते पोहत असताना मन्याड नदी पात्रात खोदण्यात आलेल्या खोल खड्याचा अंदाज न आल्यामुळे अनिल बबन नागरगोजे वय १७ वर्ष रा टाकळगाव ( शेनकुड ) ता अहमदपूर तुषार दत्ताराव पवार वय १७ वर्ष रा धसवाडी ता अहमदपूर या दोन युवकांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यु झाला असल्याची घटना घडली आहे या घटनेची माहीती ११२ क्रमांकावर पोलीसांना मिळताच ए एस आय वैजेनाथ दिंडगे , पोकॉ राम रामोळे चालक नारायण बेंबडे यांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देऊन दोन्ही युवकांचे मृत्य देह शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असुन अहमदपूर पोलीस स्टेशन येथे एम एल सी दाखल करण्यात आली आहे.