आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत कृषि महाविद्यालयास तृतीय पारितोषिक

0
आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत कृषि महाविद्यालयास तृतीय पारितोषिक

आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत कृषि महाविद्यालयास तृतीय पारितोषिक

उदगीर (प्रतिनिधी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ (मुले -मुली) स्पर्धेचे आयोजन कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय एमजीएम हिल्स गांधेली, संभाजीनगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १९ संघ सहभागी झाले होते. यामध्ये कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर च्या मुलांच्या संघाने अटीतटीच्या सामन्यांमध्ये तृतीय क्रमांक पटकविला आहे.या मध्ये ओम हनमे, हेमंत पटणे, राहुल मातलाकुटे, अल्ताफ शेख, विकास सदगर या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या यशाबद्दल नंदीग्राम कृषी एवंम ग्रामविकास संस्था, सुगांव चे सचिव गंगाधरराव दापकेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्याना खेळण्यास प्रोत्साहन व भक्कम पाठबळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उप-प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, डिडिओ डॉ. आनंद दापकेकर यांनी दिले. तसेच संघ व्यवस्थापक प्रा. विशाल सोमवंशी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!