पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबाबत कल्पक व्हावे डॉ. मारुती कदम यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : आज कुटुंबातील सर्व सदस्य आपापल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यस्त आहेत. मुलांना शाळेत पाठवणे व घरी परत आणने एवढेच काम पालक करतात पण मुलांचा गुणात्मक दर्जा वाढवायचा असेल तर पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबाबत शाळा आणि शिक्षकाची मदत घेऊन कल्पकपणे काम करावे असे आग्रही प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपक्रमशील शिक्षक डॉक्टर मारुती कदम यांनी केले. ते संत ज्ञानेश्वर विद्यालयात दि.7 आक्टोबर रोजी पालक मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विजयाताई भुसारे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.पल्लवी कदम, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मीनाक्षी तोवर सह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. मारोती कदम म्हणाले की, पालकांनी मुलांच्या मेंदूचा अभ्यास करावा. व्हाट्सअप, फेसबुक, सोशल मीडियावर व्यस्त न राहता आपण स्वतः आधी वाचन करावे आणि मग त्यांचे अनुकरण मुलं करतील असे त्यांनी सांगितले.
या वेळी डॉ. पल्लवी कदम यांनी आहार व आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. आपली दैनंदिन जीवन शैली कशी असावी ,आपल आरोग्य सुदृढ कसं राहील यासाठी सदैव कसं राहायला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राज्यस्तरावर बॉल बॅटमिंटन या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या संस्कृती पाटील व वंदना ढवळे या दोन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशाताई रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी संध्या होडगे यानी तर आभार मीना तोवर यांनी मांनले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रारंभी मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने शाल, पुष्पहार व वृक्षाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. या पालक मेळाव्यात सर्व पालकांना प्रथम घटक चाचणी परीक्षेतील पेपर फाईल दाखवण्यात आली व पाल्याच्या प्रगती बाबत वर्गशिक्षक ,विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
डॉक्टर पल्लवी कदम यांनी आहार आणि आरोग्य याविषयी उपस्थित सर्व पालकांना आपल्या दैनंदिन जीवनात आहार कसा असावा ,आपल आरोग्य सुदृढ कसं राहील यासाठी सदैव कसं राहायला पाहिजे काय खाल्लं पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राज्यस्तरावर बॉल बॅटमिंटन या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या संस्कृती पाटील वंदना ढवळे या दोन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी संध्या होडगे यानी तर आभार मीना तोवर यांनी मांनले.
पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.