महाविद्यालयीन विद्यार्थी बनावेत निवडणुकीचे दूत- राम बोरगावकर
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तहसील कार्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना तहसीलदार राम बोरगावकर म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाचे दूत बनवून कार्य करावे, जेणेकरून निवडणूक आयोगाने ठरवलेली उद्दिष्ट साध्य होतील, आणि निवडणूक प्रक्रिया सोपी होईल. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक तहसीलदार राम बोरगावकर, नायब तहसीलदार संतोष गुट्टे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नायब तहसीलदार राजश्री भोसले, पुरवठा निरीक्षण अधिकारी सुमित्रा इलमले यांचीही होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक शुभम गोणे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.बालाजी होकरणे यांनी मांडले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.सुनंदा भद्रशेट्टे, प्रा.डॉ.नीळकंठ वगशेट्टे, स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.बी.डी.करंडे, प्रा.डॉ.बंकट कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात तहसील कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान जागृती करणारी सुंदर रांगोळीचे रेखाटन केले, तसेच विश्वजीत पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे मतदान यंत्राच्या माध्यमातून (ईव्हीएम) प्रात्यक्षिके दाखवली गेली. एलईडी स्क्रीनच्या द्वारे विद्यार्थ्यांना सदरील प्रक्रिया अनेक चित्रफिती दाखवून समजावून सांगण्यात आली.