लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत कुमारीका पूजन
लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत कुमारीका पूजन
उदगीर (प्रतिनिधी) : दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख अतिथी म्हणून माता -पालक सौ.प्रियाताई बिरादार तसेच विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.प्रमुख अतिथी सौ.प्रियाताई बिरादार यांचा खणा नारळाने ओटी भरुन स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांनी देवीच्या विविध गीतांचे गायन केले. प्रमुख अतिथी सौ.प्रियाताईने शारदीय नवरात्रीचे महत्त्व सांगितले.आपण नेहमी स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे.असे सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांशी नेहमी सहकार्य वृत्तीने वागावे.सर्व मुलींना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी,असे सांगितले.सुत्रसंचलन सौ.मंजुषा पेन्सलवारबाईंनी केले.
