कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनाची गरज बनली – प्रा.डॉ.विजय जाधव

0
कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनाची गरज बनली - प्रा.डॉ.विजय जाधव

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनाची गरज बनली - प्रा.डॉ.विजय जाधव

उदगीर (प्रतिनिधी) : सध्याचे जग हे तंत्रज्ञानावर आधारित चाललेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला खूप उभारी मिळत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनाची गरज बनली आहे, असे मत डॉ .विजयकुमार जाधव यांनी काढले.ते शिवाजी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि दीप अकॅडमी उदगीर ,यांच्या संयुक्त
विद्यमाने “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिची भविष्यातील व्याप्ती ” या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए .एम. नवले होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. विजयकुमार जाधव यांची उपस्थिती होती .याप्रसंगी बोलताना डॉ.जाधव म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित संकल्पना आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात वापरली जात आहे .मानवाच्या बुद्धीप्रमाणे रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे,असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.ए.एम. नवले म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विवेकावर आधारित असावा, मानवी मूल्यांच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित व्हावी. तसेच प्रत्येकाने ए.आय.चा वापर चांगल्या कामासाठी करावा असे ते म्हणाले, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.व्हि.डी.गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार कु. आयशा शेख हिने केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!