मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – 2 शिवाजी विद्यालय बिटरगाव शाळेस तृतीय पारितोषिक
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा - 2 शिवाजी विद्यालय बिटरगाव शाळेस तृतीय पारितोषिक
लातूर (प्रतिनिधी) : जेएसपीएम संस्था द्वारा संचलित शिवाजी विद्यालय बिटरगाव या शाळेने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी, शिक्षण महर्षी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या आशीर्वादाने व संस्थेचे उपाध्यक्ष अजित सिंह पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाने तालुका स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. त्यानिमित्त शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कव्हेकर यांनी मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वसंत यादव, अंकुश शेळके , वेणूनाथ यादव, ठोंबरे , विनोद जाधव, गौतम जाधव, यशवंत ,सोनटक्के उपस्थित राहून त्यांनीही शुभेच्छा दिल्या.
