देवी हिंबुलांबिका भ्रष्टाचाराचा खात्मा कर, सुराज्य दे – विश्वजीत गायकवाड

0
देवी हिंबुलांबिका भ्रष्टाचाराचा खात्मा कर, सुराज्य दे - विश्वजीत गायकवाड

देवी हिंबुलांबिका भ्रष्टाचाराचा खात्मा कर, सुराज्य दे - विश्वजीत गायकवाड

उदगीर (प्रतिनिधी) : हिंदू धर्माची आराध्य दैवत तथा समाजाला दिशा देणारी दैवी शक्ती हिंबलांबीका देवी यांच्या चरणी नतमस्तक होत असताना मी एकच प्रार्थना करेन की देवी समाजात वाढलेला भ्रष्टाचार आणि दुराचार नष्ट कर, माझ्या समाजातील सर्वसामान्य गोरगरीब माणूस सुखा समाधानाने जगू दे, असे उद्गार उद्योगपती विश्वजीत गायकवाड यांनी उदगीर येथील हिंबुलांबिका देवी मंदिरात आरती केल्यानंतर भक्तगणांना मार्गदर्शन करताना विचार मांडले.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पूदाले तसेच इंजि. विश्वजीत गायकवाड फाउंडेशनचे पदाधिकारी अधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी अधिकारी उपस्थित होते.
याप्रसिंनी पुढे बोलताना विश्वजीत गायकवाड यांनी स्पष्ट केले की, समाजामध्ये भ्रष्टाचारी प्रवृत्ती खूप वाढली आहे. त्या प्रवृत्तीचा नायनाट झाला पाहिजे. विकासाच्या नावाने गुत्तेदारांचा, दलालाचा विकास झाला मात्र सर्वसामान्य जनतेच्या हातात काय? आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना उदरनिर्वाहासाठी रोजगार मिळावा म्हणून प्रशिक्षण देत आहोत. रोजगाराची साधन मिळावे म्हणून शिलाई मशीन सारखे साहित्य फाउंडेशनच्या वतीने महिलांना वाटप करत आहोत. आज उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास साडेतीनशे महिलांना आम्ही शिलाई मशीन वाटप केले आहे. आणि त्यांनी शिलाई केलेले साहित्य आम्ही फाउंडेशन साठी खरेदी केले आहे. एका अर्थाने हा महिलांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न छोटेखानी असेल पण आम्ही स्वखर्चाने केलेला आहे. आणि यापुढे भविष्यात उदगीर विधानसभा मतदारसंघात गरीबी हटाव साठी आम्ही टोकाची भूमिका घेणार आहोत. सुशिक्षित बेकरांचे प्रश्न मिटवण्यासाठी युद्धपातळीवर मी प्रयत्न करणार आहे. असेही इंजि. विश्वजीत गायकवाड यांनी सांगितले.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मनोज पूदाले यांचा सत्कार भावसार समाजाच्या वतीने उमेश हिबारे यांनी केले. तसेच विश्वजीत गायकवाड यांचा सत्कार सुनील अशोकराव महेंद्रकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भावसार समाजाचे भूषण बुलबुले गुरुदत्त, महिंद्रकर गिरीश, गरजे अशोक, गुलबुले किशन, प्रमोद गर्जे, गणेश कालेकर, सुधीर महेंद्रकर, राजेश सुत्रावे, श्रीकृष्ण कमीतकर,
अनिरुद्ध रणसुभे, किरण गरजे, श्याम ढगे, बालाजी ढगे, तुषार बुलबुले, संतोष गर्जे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना विश्वजीत गायकवाड म्हणाले की, आई तुळजाभवानी शिवरायांना अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्यासाठी भवानी तलवार दिली. तशी शक्ती मला दे. मी समाजातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी कायम तुझ्या चरणी नतमस्तक असेन, अत्यंत भावनिक आणि जनतेच्या कल्याणाचे विचार मांडल्याबद्दल लोकांमधून विश्वजीत गायकवाड यांच्या बद्दल आपुलकीची भावना प्रचंड वाढली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!