राष्ट्रवादी युवती काँग्रेस उदगीर तालुका अध्यक्ष पदी संगिता आवळे यांची निवड
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुका पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेस युवती आघाडी च्या तालुका अध्यक्षपदी संगीता आवळे यांची निवड करण्यात आली असून क्रिडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग लातूर जिल्ह्यध्यक्ष अभिजीत औटे व राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्षा दिपाली औटे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्ह्यध्यक्षा साक्षी कांबळे यांनी केली. या वेळेस उदगीर महिला शहराध्यक्षा मधुमती कनशेट्टे, अल्पसंख्यांक जिल्ह्यध्यक्ष शफी हाशमी, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शुभम भुमने, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, राजकुमार बिरादार यांच्या उपस्थितीत सदरील निवड संपन्न झाली. या निवडीबद्दल आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, जिल्ह्यध्यक्ष अफसर शेख, प्रदेश सरचिटणीस समिर शेख, विधान सभा अध्यक्ष प्रविण भोळे, उदगीर तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहर अध्यक्ष सय्यद जानी, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, सामाजिक न्याय विभाग जिल्ह्यध्यक्ष प्रदिप जोंधळे, महिला शहर कार्याध्यक्षा वैशाली कांबळे, प्रिती कवठीकर, रंजना चिखळे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.