स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. वाहनासह 3 लाख 43 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

0
स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. वाहनासह 3 लाख 43 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. वाहनासह 3 लाख 43 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यातील अवैध धंद्यावर मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वाहनासह तीन लाख 43 हजार रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केली आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 14/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीमध्ये लेबर कॉलनी परिसरात रोडवर एका लाल रंगाच्या स्विफ्ट कार थांबलेली असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक करण्यात आली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 14/10/2024 रोजी गांधी चौक हद्दीमध्ये लेबर कॉलनी परिसरात रोडवर एका लाल रंगाची स्विफ्ट कार ताब्यात घेऊन पाहणी केली असता, त्या मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला 43 हजार 350 रूपयाचा गुटखा व सुगंधित पानमसाला असा व एक स्विफ्ट कार असा एकूण 03 लाख 43 हजार 350 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला, तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक केल्याचे मिळून आलेले इसम नामे अमान जकियोदीन सय्यद, (वय 19 वर्ष रा. श्याम नगर, लातूर), समीर जकियोदीन सय्यद, (रा. श्याम नगर, लातूर) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार साहेबराव हाके , संजय कांबळे, मोहन सुरवसे, मनोज खोसे, राहुल कांबळे यांनी पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!