अहमदपूर- चाकूर मतदारसंघात ३ लाख ४७ हजार४५४ मतदार बजावणार हक्क

0
अहमदपूर- चाकूर मतदारसंघात ३ लाख ४७ हजार४५४ मतदार बजावणार हक्क

अहमदपूर- चाकूर मतदारसंघात ३ लाख ४७ हजार४५४ मतदार बजावणार हक्क

३७६ मतदान केंद्रे : निवडणूक विभागासह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज
अहमदपूर (गोविंद काळे) : येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अहमदपूर -चाकूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून या मतदारसंघात ३ लाख ४७ हजार ४५४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी ३७६ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.मंजुषा लटपटे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर त्यांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून अहमदपूरचे तहसीलदार उज्वला पांगरकर व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव व नायब तहसीलदार संतोष अनर्थे, संजय भोसीकर, एम.ए. मुजावर, संतोष धाराशिवकर, अभिलाष जगताप, एस.आर. जवादे, एन.बी. अर्जूने, प्रल्हाद रिठे सहकार्य करणार आहेत.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात १ लाख ९५ हजार, ६९५ एकूण मतदार संख्या आहे. पुरुष मतदार संख्या १ लाख २१ हजार ९९तर महिला मतदार संख्या ९३ हजार ५२५चाकूर मतदारसंघात १लाख५१ हजार७३० एकूण मतदार संख्या आहे. पुरुष मतदार संख्या ७९ हजार६०५तर महिला मतदार संख्या ७२ हजार१२४ एकूण मतदार १ लाख ५१ हजार७३० असे अहमदपूर -चाकूर विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ४७ हजार ४५४ मतदार आपला मतदानाचा हक्क ३७६ मतदान केंद्रांवर बजावणार आहेत.

९ नविन मतदान केंद्र

मागील निवडणूकीच्या वेळेस अहमदपूर -चाकूर विधनसभा निवडणूकीत३६७ मतदान केंद्र होते. त्यात ९ मतदान केंद्राची भर पडली असून त्यात देवकरा, परचंडा, अहमदपूर, मांडणी, नांदुरा, शिरूर ताजबंद-२हाडोळती -२ आसे९ नविन मतदान केंद्राची भर पडली आहे.

८५ वर्ष वयावरील मतदाराची यादी तयार करण्यात आल्या असून घरपोच मतदानाची तयारीही करण्यात आली आहे. त्यासाठी वीस पथके तयार करण्यात आले आहेत. अहमदपूर तालुक्यात चार ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले असून त्यासाठी पोलीस प्रशासन हो सज्ज झाले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
शहरातील बॅनर, स्वागताच्या कमानी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तत्काळ हटवून रस्ते मोकळे केले आहेत. निवडणुकीची सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णयअधिकारी डॉ.मंजुषा लटपटे यांनी दिली. अहमदपूर -चाकूर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४७ हजार मतदार मतदानाचा हक्क ३७६ केंद्रावर बजावणार आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *