स्वीप पथकाद्वारे बसस्थानकावर केली मतदार जनजागृती

0
स्वीप पथकाद्वारे बसस्थानकावर केली मतदार जनजागृती

स्वीप पथकाद्वारे बसस्थानकावर केली मतदार जनजागृती

अहमदपूर (गोविंद काळे) : भारत निवडणूक आगोगाच्या आदेनान्वे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी होणाऱ्या निवडणूकीत, राज्यातील सर्वात मोठ्या लोकशाही महोत्सवात मतदानाचा टक्का वाढावा,मतदारांने मतदान करावे यासाठी अहमदपूर तहसील प्रशासनाच्या वतीने स्वीप पथकाने बसस्थानकावर मतदार जनजागृती केली.
सर्व प्रवासी मतदार बांधवांना २० नोव्हेंबर रोजी १००% मतदार करुन राष्ट्रीय कार्यात आपण सर्वांनी सहभाग नोंदवावे.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार उज्वला पांगरकर,चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बस्वेश्वर थोटे,संभाजी यलपुरवाड,विवेकानंद भंडे,यांच्यासह आगार प्रमुख अमर पाटील, स्थानक प्रमुख चाँद देशमुख, सहाय्यक अधिक्षक नागेश कोकाटे, वाहतूक निरीक्षक भरत केदासे , नरेंद्र लोहरे ,वाहतूक नियंत्रक किशन केंद्रे जेष्ठ वाहक संजय संगेवार ,चालक भगवान साळुंके आदिसह शेकडो प्रवाशी उपस्थितीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *