अहमदपूर बाजारपेठेत मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी स्वीप पथकाने केली जनजागृती
अहमदपूर (गोविंद काळे) : जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीवर विशेष भर दिला असून ‘चुनाव का पर्व, देश का गौरव’ या टॅग लाईनखाली मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार, ‘आपणही आपल्या विनासभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सज्ज रहा’ असे सांगत स्वीप पथकाने अहमदपूर शहरात आठवडी बाजारपेठेत मतदार जनजागृती केली. सदर मोहिमेतून मतदानाबाबत प्रबोधनात्मक संदेशात्मक फलक हातात घेऊन सुजान व वयोवृध्द मतदार बांधवाना लोकशाही बळकट करण्यासाठी..मी मतदान करणार.!,संविधानाने दिलेला अधिकार बजावण्यासाठी.. मी मतदान करणार..!,लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी.. मी मतदान करणार..!,राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी.. मी मतदान करणार..!मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी.. मी मतदान करणार..!असा संदेशाचे फलक हातात घेऊन हजारोंच्या संख्येने उपस्थितीत असलेले भाजीपाल्याच्या बाजारपेठेत सोमवार रोजी जनजागृती करण्यात आले.
बाजार हे एक ठिकाण आहे जेथे खरेदीदार आणि विक्रेते वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण किंवा व्यवहार सुलभ करण्यासाठी भेटू शकतात.या लोकसमुहाचा आधार घेऊन मतदार जनजागृती केली. या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार उज्वला पांगरकर,चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती होत आहे. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,अर्चना माने,बस्वेश्वर थोटे,संभाजी यलपुरवाड,विवेकानंद भंडे,प्रमोद हुडगे,नाकाडे,विवेकानंद मठपती,जयप्रकाश हाराळे, यांच्यासह पेठेतील हजारो ग्राहक व विक्रेते उपस्थितीत होते.