एलसीबीची अवैध धंद्यावर कारवाई, वाहनासह 11 लाख 72 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

0
एलसीबीची अवैध धंद्यावर कारवाई, वाहनासह 11 लाख 72 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

एलसीबीची अवैध धंद्यावर कारवाई, वाहनासह 11 लाख 72 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सक्रिय झाली असून पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली एका नंतर एक धाडी टाकत आहेत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखू च्या विरोधात कठोर भूमिका घेऊन कारवाई केली आहे या कारवाईत वाहनासह अकरा लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 24/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, काही काही व्यक्ती लपून-छपून नवनवीन मार्गाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक व वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी दिनांक 24/10/2024 रोजी लातूर शहरातून पोलीस ठाणे रेणापूर व विवेकानंद चौक हद्दी मधून वाहतूक व साठवणूक करण्यात आलेला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 11लाख 72 हजार 650 रूपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू , एक इनोव्हा कारसह जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या ट्रान्सपोर्टिंगच्या माध्यमातून वाहतूक व साठवणूक केल्याचे मिळून आलेले इसम नामे
बिलाल महताबसाब तांबोळी (वय 26 वर्ष रा. रेणापूर), बालाजी आळणे, (रा. कळंब जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) ), फिरोज चांदसाब मणियार, (वय 35 वर्ष,राहणार बौद्ध नगर लातूर).यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे रेणापूर व विवेकानंद चौक चे पोलीस अधिकारी,अंमलदार करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, रामहरी भोसले, अर्जुन राजपूत, दीनानाथ देवकते, युवराज गिरी, मनोज खोसे, राहुल कांबळे, खुर्रम काझी, रियाज सौदागर, विनोद चलवाड, जमीर शेख यांनी पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *