निवडणूक निरिक्षक यांचे मतदान केंद्र व EVM सुरक्षा कक्ष व मतमोजणी कक्षास भेट
उदगीर (प्रतिनिधी) : साकेत मालविय निवडणूक निरीक्षण व अस्मल तडवी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. लातूर तथा संपर्क अधिकारी यांनी 237 उदगीर अ.जा. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत तिवटग्याळ व करडखेल येथील मतदान केंद्रावर भेट दिले. निवडणूक निरिक्षक यांनी 237 उदगीर अ.जा. करीता सुनिश्चीत केलेल्या EVM सुरक्षा कक्ष व मतमोजणी कक्षास भेट दिले.
त्या भेटीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक यांनी सर्व यंत्रणाना सुचना व मार्गदर्शन केले. त्याचे कार्यत्परतेने अंमलबजावणी करीता सुचना दिल्या. त्यांच्या समवेत सुशांत शिंदे निवडणूक निर्णय अधिाकरी तथा उपविभागीय अधिकारी उदगीर व राम बोरगावकर सहा. निवडणूक निर्णय अधिकारी,तथा तहसीलदार उदगीर व राजेश लांडगे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी,तथा तहसीलदार जळकोट, प्रविन सुरडकर गट विकास अधिकारी तथा आचार संहिता पथक प्रमुख, विलास सोनवणे नायब तहसीलदार तथा EVM नोडल अधिकारी उदगीर, निखील घाडगे नायब तहसीलदार तथा निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क प्रमुख तथा नोडल अधिकारी, शंकर जाधव,गणेश हिवरे, संतोष चव्हाण ,पंडित जाधव ,मंडळ अधिकारी, दिनकर फुटाने सहा. महसुल अधिकारी, अमोल रामशेट्टे देवप्रिय पवार , ग्राम महसूल अधिकारी, गणेश कूलकर्णी महसूल सहाय्यक आदी उपस्थित होते.