नागरिकांचा प्रेमवर्षाव आ. बाबासाहेब पाटील यांच्या लोकप्रियतेचा वाढता ओघ
आ. बाबासाहेब पाटील यांचा वाढता पाठिंबा ही विजयाची नांदी.
अहमदपूर( गोविंद काळे )चाकूर तालुक्यातील ब्रह्मवाडी, अलगरवाडी, हणमंतवाडी आणि हणमंतवाडी तांडा, तीर्थवाडी, मांडुरकी, शिरनाळ, मष्णेरवाडी, टाकळगाव, बोरगांव (बु.), व नागदरवाडी या गावांमध्ये आ. बाबासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान नागरिकांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत आपल्या मनातील आमदार बाबासाहेब पाटीलच असल्याचे अप्रत्यक्षपणे व्यक्त केले. आ. पाटील यांनी आजवर केलेल्या समाजहिताच्या कार्याची ही फलश्रुती असून, पुढेही जनसेवेची ऊर्जा मिळविणारे हे क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जि. नि. स. सदस्य पद्माकरराव पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ माने, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, शिवसेना तालुकाप्रमुख खंडेराव वाघ, माजी जि. प. सदस्य दयानंदराव सुरवसे, हनुमंतराव पाटील, युवराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहुल सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष गंगाधरआप्पा अक्कानरू, गणपत महाराज नितळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दयानंदराव पाटील, शिवाजीराव माने, ॲड. संतोष गंभीरे, उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार, नगरसेवक इलियास सय्यद, भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, साईप्रसाद हिप्पळे, नरसिंग गोलावार, हनुमंतराव लवटे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.