अहमदपूर शहरात शिटी सुसाट
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर चाकूर मतदार संघातील विधानसभेच्या उमेदवारा मधून जनसामान्य उमेदवार व जनसामान्याचा उमेदवार म्हणून गावागावातून होत असलेल्या गणेश हाके नावाची सध्या अहमदपूर शहरांमध्ये ही मोठा बोलबाला दिसून येत आहे.
मातब्बर उमेदवाराच्या तुलनेत स्वतः सर्वसामान्य घराण्यातील जनसामान्य उमेदवार म्हणून गणेश हाके परिचित असून या दोन्ही दिग्गज प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिकचा पूर्वीपासूनच त्यांच्या मंत्रालयीन कामाचा मोठा अनुभव त्यांना अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार करणे गरजेचे आहे असे मतदारांमध्ये चर्चिले जात आहे. शहरांमध्ये सर्व मतदाराच्या तोंडून “आपकी बार गणेश दादा आमदार” ‘अभी नही तो कभी नही’ असे प्रत्येक वार्डा मधून गणेश हाकेला जनतेची साथ मिळत आहे.
प्रस्थापित दोन्ही आमदाराची कामे जनतेने पाहिली आहेत त्यामुळे एक वेळेस गणेश हाके यांना संधी देऊन त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शहराच्या विकासासाठी करून घेऊया असे शहरांमध्ये वातावरण निर्माण झाले.