गावठी कट्टा बाळगणारा इसम ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कारवाई
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक अनुषंगाने जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात विशेष पथक नेमून कार्यवाही करण्यात येत होती.
पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न होताच रेणापूर तालुक्यातील रेणापूर ते समसापूर गावाकडे जाणाऱ्या रोड वरून एका इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा (पिस्टल) हस्तगत करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर इसम नामे
कृष्णा बालाजी कदम, (वय 23 वर्ष, राहणार लक्ष्मी नगर, रेणापूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आले.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 397/2024 कलम 3 (1) 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास रेणापूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय उत्कृष्टरित्या गोपनीय माहितीचे संकलन व विश्लेषण करून करून गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक राजश्री तेरणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथका मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस अंमलदार माधव बिलपटे , नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजेश कचे, प्रदीप स्वामी, राजू मस्के, नकुल पाटील यांनी केली आहे.