ना. संजय बनसोडे यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकास कामे केली – चंद्रशेखर पाटील आतनूरकर
ना. संजय बनसोडे यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकास कामे केली - चंद्रशेखर पाटील आतनूरकर
उदगीर (प्रतिनिधी) : राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्व धर्म समभाव जपणारे सरकार असून योजनांचा लाभ देताना कधीही जातीपातीचा विचार या सरकारने केला नाही. मात्र आज निवडणुकीत केवळ निवडून येण्यासाठी विरोधक जातीधर्माचा आधार घेत आहेत. अशा जातीपाती मध्ये अडकलेल्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या, ना. संजय बनसोडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा अतनूर गावचे सरपंच चंद्रशेखर पाटील आतुरकर यांनी केले आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघात गावागावातून ना. संजय बनसोडे यांचे स्वागत मतदार उत्स्फूर्तपणे करत आहेत. या प्रचार सभा आहेत की विजय रॅली आहे, याचा संभ्रम व्हावा इतका उत्साहात प्रचार सभेला नागरिक उपस्थित राहत असल्याबद्दल चंद्रशेखर पाटील यांनी मतदारांचे आभार व्यक्त करत हा उत्साहच ना. संजय बनसोडे हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील याची नांदी ठरणार आहे. असे स्पष्ट करतानाच मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहनही केले आहे.
कार्यकर्त्यांच्या अतिशय उत्साही सहभागातून पार पडलेल्या या कॉर्नर सभेला असलेली गर्दी पाहून ना. बनसोडे अक्षरश: भारावून गेले. उदगीरकरांनी दिलेले प्रेम हे कदापि न विसरण्यासारखे असून आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत या भागाची सेवा करीत राहु अशी ग्वाही देखील यावेळी ना. बनसोडे यांनी दिली.
यावेळी माजी आ.गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपसभापती रामराव बिरादार, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, सुदर्शन मुंडे, सुधीर भोसले, मनोज पुदाले, शफी हाशमी, गुरुनाथ बिरादार, विजय निटुरे, साईनाथ चिमेगावे, सय्यद जानीमियाँ, प्रा.श्याम डावळे, अनिल मुदाळे, गिरीश उप्पबावडे, शिवराज नावंदे, शेख फय्याज, नरसिंग शिंदे, समद शेख, अमर सुर्यवंशी, अरूणा चिमेगावे,वैशाली कांबळे, उर्मिला वाघमारे, प्रकाश येरमे यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. बनसोडे म्हणाले की, या भागातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला आमदार म्हणून निवडून दिले. आमदार झाल्यानंतर आपल्या आशीर्वादाने मला मंत्रिपदाची संधी मिळाली. या काळात जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवीत मी मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली. विकासकामे करीत असताना मी कधीही कसला दुजाभाव केला नाही. प्रत्येक जातीधर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघातील रस्ते दर्जेदार करून घेत असतानाच या शहराच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले. महायुतीच्या सरकारने राबविलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशिल असतो असे सांगून ना. बनसोडे यांनी आगामी काळात उदगीरला जिल्हा करण्यासाठी पुन्हा एकदा मला संधी द्यावी असे आवाहन केले.
आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आपली जात आठवत आहे. जातीच्या नावावर ते मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून मी कधीही जात पाहिली नाही. पाच वर्षात आमदारकी व मंत्रीपदाची मस्ती कधी माझ्या मस्तकात शिरू दिली नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या हक्काचा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी आपली ताकद उभी करा. असे आवाहनही ना. बनसोडे यांनी यावेळी केले.
१) चौकट:
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणजे ना.संजय बनसोडे आहेत असे सांगून उदगीरच्या विकासासाठी ना. बनसोडे याना साथ देण्यासाठी मी ज्या पक्षात 40 वर्षे काम केले तो पक्ष सोडला पण ना.बनसोडे यांना सोडले नाही. सामान्यांसाठी काम करण्याची तळमळ असलेला नेता म्हणजे संजय बनसोडे आहेत. कोरोनाच्या काळात अतिशय तळमळीने काम करून या भागातील जनतेच्या आरोग्याची त्यांनी काळजी घेतली आहे. एक चारित्र्यवान लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघाला मिळाला असून त्यांचे नेतृत्व जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे सांगून निटूरे यांनी येत्या 20 तारखेला ना. संजय बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.
२) चौकट :
या कॉर्नर सभेत बोलताना माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी विरोधी उमेदवारांवर चांगलाच घणाघात केला. विरोधी पक्षाचे उमेदवार हे नाटकी असून त्यांच्या निष्क्रियतेमुळेच पक्षाने त्याना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली नाही. आता दुसऱ्या पक्षकडून निवडणूक लढवीत ते मते मागत आहेत. दहा वर्षे त्यांना संधी मिळाली मात्र दहा वर्षे काहीच काम केले नाही असा आरोप करून माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी महायुतीचे उमेदवार ना. संजय बनसोडे हे विकासाभिमुख नेतृत्व उदगीरला मिळाले हे उदगीरकरांचे भाग्य आहे. त्यांनी पाच वर्षात उदगीरचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. असे असताना विरोधकांकडून चुकीच्या अफवा पसरविण्याचे काम सुरु आहे. त्या अफवांना कोणीही बळी पडू नका असे आवाहन केले. घटना बदलण्याची भीती घालून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेत दिशाभूल केली, हे सरकार मुस्लीम समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. खोटे बोलून विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असून हे सारे चुकीचे आहे. त्याकडे लक्ष न देता मतदारांनी उदगीरच्या विकासासाठी ना. संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा निवडून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी शेख इमामसाब, शेख मेहबुब, अलिम कुरेशी, शेख मेहबुब जाकेरसाब, कृष्णा मामडगे, लक्ष्मण मामडगे, अॅड.अमोल तलवाडकर, शेख खाजा, शेख निझाम, सय्यद सैलानी, शेख अल्मु, शेख चाँदसाब, सिध्दार्थ सुर्यवंशी, विजय भालेराव, आझम पटेल आदीसह सह बनशेळकी रोड व परिसरातील हजारो नागरीक उपस्थित होते.
