आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रचाराची प्रचंड जनसमुदायाच्या आशीर्वादाने सांगता!

0
आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रचाराची प्रचंड जनसमुदायाच्या आशीर्वादाने सांगता!

आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रचाराची प्रचंड जनसमुदायाच्या आशीर्वादाने सांगता!

अहमदपूर (गोविंद काळे) : आ. बाबासाहेब पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असताना विविध विकासकामे मार्गी लावली असून यासाठी त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात सकारात्मकता आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिरूर ताजबंद या ठिकाणी पदयात्रा आयोजित करून सुरू झालेल्या प्रचाराची सांगता चाकूर गावातून किनगाव गावात झाली. यावेळी नागरिकांचा प्रचंड जनसमुदाय आणि त्यांचे आशीर्वाद यामुळे आ. पाटील यांचा विजय पुन्हा एकदा निश्चित मानला जात आहे.

याप्रसंगी किनगाव गावातून सचिन भाऊ साठे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेना तालुकाध्यक्ष गोपाळा भाऊ माने, रिपाई जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, मा. सभापती करीम साहेब गुळवे, मा. जि. प. सदस्य अशोक काका केंद्रे, त्र्यंबक आबा गुट्टे, किशोर बापू मुंडे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, तालुका अध्यक्ष भाजप वसंतराव डिगोळे, रिपाई तालुकाध्यक्ष पप्पनराव कांबळे, नगराध्यक्ष कपिल भैया माकणे, मा. जि. प. सदस्य सुदर्शन मुंडे, मिलिंदराव महालिंगे, ह. भ. प. सूळ महाराज, सय्यद मुर्तुझा, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यशवंतराव जाधव, तुकाराम मद्दे, उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार, नितीन रेड्डी, ॲड. भारत भाऊ चामे, इलियास सय्यद, मुजीब पटेल जहागीरदार, महंमद सय्यद, मुजमील सय्यद, संचालक राहुल सुरवसे, भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, साई हिप्पाळे, भानुदासराव पोटे, बाळूभाऊ लाटे, ॲड. टी. एन. कांबळे, पद्माकरराव पाटील, बाबुभाई रुईकर, दयानंदराव सूर्यवंशी, दयानंदराव पाटील, गणी बागवान, मधुकरराव मुंडे, विष्णुकांत तिकटे, ॲड. संतोष गंभीरे, भागवत गुट्टे, तुकाराम तेलंगे, संदीप शेटे, सागर भैया होळदांडगे, सुरज शेटे, बिलाल पठाण, खंडेराव वाघ, किरण गायकवाड, किशन गौंडगावे, सिद्धेश्वर अंकलकोटे, मधुकर कांबळे, आशिष तोगरे, ॲड. आशिष वाघमारे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी शरद पवार गट बॅकफुटवर : माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जहागीरदार

“अहमदपूर – चाकूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विनायकराव पाटील बॅकफूटवर गेले आहेत, हे आता सर्वश्रुत आहे. शरद पवार साहेबांना हे माहीत आहे की ही जागा जिंकणे त्यांच्या गटासाठी अवघड आहे, म्हणूनच त्यांनी येथे कोणतीही सभा घेतली नाही. जनतेचा पाठिंबा हरवलेल्यांसाठी सभा घेऊनही उपयोग होत नाही.”

अशा प्रकारे स्पष्ट होते की, या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट प्रचंड मजबूत आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *