जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांना महात्मा फुले ब्रिगेड व राष्ट्रीय बहुजन पार्टी यांचा जाहीर पाठिंबा
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांना महात्मा फुले ब्रिगेड व राष्ट्रीय बहुजन पार्टी यांचा जाहीर पाठिंबा
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश हाके यांना महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस उत्तम गोरे व राष्ट्रीय बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन शृंगारे यांनी गणेश हाके हे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करतील या आशेने दोन्ही संघटनेच्या वतीने पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांनी महात्मा फुले ब्रिगेड चे प्रदेश सरचिटणीस उत्तम गोरे व राष्ट्रीय बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन शृंगारे यांनी भेट घेऊन मतदारसंघातील सध्या परिस्थितीवर चर्चा केली गणेश हाके यांच्या मनात असलेला मतदार संघाच्या विकासाच्या आराखडा त्यांच्यासमोर मांडला. गणेश हाके यांनी मांडलेल्या विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेता दोन्ही संघटनाने बिनशर्थ गणेश हाके यांना पाठिंबा जाहीर केला.
दोन्ही संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अहमदपूर चाकूर मतदारसंघाच्या विकासासाठी गणेश हाके यांना आम्ही पाठिंबा देत आहोत त्यामुळे आमच्या संघटनेची निगडित सर्व समाज बांधवांनी गणेश हाके यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं असे आवाहन केले.
