ज्ञानेश्वरीने पुन्हा मिळवले कास्यपदक
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्हा तलवारबाजी संघटना लातूर ची खेळाडू व सध्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथील विद्यार्थिनी कुमारी ज्ञानेश्वरी शिंदे हिने जम्मू येथे दिनांक 06 ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कास्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत माही आरदवाड, सोनाली गायकवाड, अक्षय कदम, सुरज कदम, भाऊराव कदम, अश्विनी फड हे खेळाडू सहभागी झाले होते या सर्वांना प्रशिक्षक मोसिन शेख व प्रशिक्षक आकाश बनसोडे या दोघांचा मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर संघाचे व्यवस्थापक श्री प्रा. अभिजीत मोरे सर व प्रा. राहुल वाघमारे सर यांचेही योग्य मार्गदर्शन तिला लाभले. ज्ञानेश्वरीचे अभिनंदन क्रीडा संचालक श्री. प्रा. भास्करराव माने, क्रीडा महर्षी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. दत्ताभाऊ गलाले, मुख्याध्यापक प्रशांत माने व श्री. संतोष कदम यांनी केले.