किरकोळ कारणावरून एकाचा खून गुन्हा दाखल, एक आरोपी फरार

0
किरकोळ कारणावरून एकाचा खून गुन्हा दाखल, एक आरोपी फरार

किरकोळ कारणावरून एकाचा खून गुन्हा दाखल, एक आरोपी फरार

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील अडत बाजाराच्या जवळ दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी अडीच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान नवामोंढा येथील चौधरी स्वीट मार्ट च्या पाठीमागे, वाघमारे देशी दारू दुकानाच्या समोर एका व्यक्तीचा खून करून टाकून दिल्याची चर्चा शहरात पोहोचताच, एकच हलकल्लोळ माजला.
यासंदर्भात पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, फिर्यादी आयशा गौस पठाण (वय 40 वर्ष राहणार समता नगर उदगीर) यांनी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावर आरोपी पठाण अल्लाबक्ष नबीसाब आणि जमीर या दोघांनी मिळून तिचा पती गौस नूरमहम्मद पठाण (वय 55 वर्ष राहणार समता नगर) यास आरोपीनी तू मोबाईल का घेतलास? असे विचारणा करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारले. अशा पद्धतीचा जबाब दिल्यावरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे आरोपींच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 307 /24 कलम 103(1) 3 (5) बी एन एस प्रमाणे नोंद करण्यात आला असून यातील एक आरोपी पठाण अल्लाबक्ष नबीसाब यास शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. मात्र दुसरा आरोपी हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत.
दिवसाढवळ्या मोंढा बाजारपेठेत खुनासारखा गंभीर गुन्हा झाल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *