राष्द्रवादी कॉग्रेस पार्टी महायुतीचे बाबासाहेब पाटील ३१६८५ विक्रमी मतांनी विजयी
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर -चाकूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार गट ) महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील ३१ हजार ६८५ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे विनायकराव जाधव – पाटील यांचा पराभव झाला तर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांना तिसऱ्या स्थानी समाधानी राहावे लागले.या मतदारसंघांत २० उमेदवारांना एकूण २ लाख ३९ हजार ६२५ मतदान झाले होते. या उमेदवारांना मिळालेली मते अशी : (महायुती )बाबासाहेब पाटील- ९५ हजार ७७७ (विजयी), ( महाविकास आघाडीचे ) विनायक जाधव पाटील – ६४ हजार ०९२, ( जनसुराज्य शक्तीपक्ष) गणेश हाके – ६१ हजार २९०, ( बसपा )अॅड. गायकवाड रमेश ८२९( मनसे), डॉ. नरसिंह भिकाने ११११ ,गिरजाप्पा बैकरे (महाराष्ट्र विकास आघाडी), १०२९
जाधव विनायक (राष्ट्रीय मराठा पार्टी), ३८९६धीरज कांबळे (सैनिक समाज पार्टी),२०९अॅड. रियाज अहमद सिद्दीकी (जनहित लोकशाही पार्टी),
४३८ वागलगावे रावसाहेब (बहुजन विकास आघाडी), २४८ उत्तम वाघ, ७१८ अॅड. एकनाथ गजिले, ३१९
कदम पुंडलीक, ४४१जाधव गणेश, १६८दीपक कांबळे, ३०८बालाजी पाटील, २९७४महादेव भंडारे, २४३
माधव जाधव, २५४६विशाल बालकुंदे, १६२संजीव चन्नागीरे४६४
(सर्व अपक्ष) नोटा८१२ आसे२ लाख३८ हजार
७४औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये कडेकोट बंदोबस्तात २३ नोव्हेंबर शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेण्यास सुरवात केली. परंतु महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी आठव्या फेरीत आघाडी घेण्यास सुरवात केली. ती आघाडी शेवट पर्यंत कायम ठेवत विजय मिळवला.
राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील विजयी झाले. त्यांची शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.