छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपने साजरा केला संविधान गौरव दिन

0
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपने साजरा केला संविधान गौरव दिन

छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपने साजरा केला संविधान गौरव दिन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपने सकाळी ७:०० वाजता योगा मैदानावर संविधान गौरव दिन साजरा केला.
प्रथम छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप चे अध्यक्ष श्री एन डी राठोड यांच्या शुभहस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री विलास पडले आणि गणेश वाघमारे यांच्याबरोबर सर्व सन्माननीय सदस्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री डी एस वाघमारे सर यांनी भारतीय संविधानातील 356 कलमा बाबत आणि 24 परिशिष्टा बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी हेही सांगितले की हुकूमशाही व दडपशाही कितीही प्रबळ होत असली तरीही संविधानातील कायद्यानुसार भारत भक्कमपणे उभा आहे व नुकताच 75 वा सुवर्ण महोत्सवी वर्ष भारताने साजरा केला आहे व अशा या भारताच्या संविधानाचा आज आपण गौरव दिन साजरा करत आहोत.
संविधान गौरव दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मंदाडे यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे कार्य ह भ प संजय महाराज नागपूरने यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *