पर्यावरण प्रेमी उद्योजक विक्रम मुडपे यांचा सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : भारत मल्टी पर्पज सोसायटी नळगीर तर्फे, प्राचार्य विजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, संस्था सचिव देविदास राव नादरगे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पुणे येथील पर्यावरण प्रेमी उद्योजक विक्रम मुडपे यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. ह्यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे, आनंद जाधव, सुरेश रेड्डी, ज्ञानोबा कुंडगिरी, प्रशांत पांचाळ, प्रफुल्लता बोडके, रोहित बिरादार, वर्षाताई पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विक्रम मुडपे गुडसूरचे भूमिपुत्र असून पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हेरिटेज कंपनीचे ते मालक आहेत. उत्तम प्रकारे आपला उद्योग सांभाळत सामाजिक बांधिलकी ते जपतात.
पन्नास व्यक्तींचा त्यांचा गट असून तीर्थक्षेत्र आळंदी व सिंहगड येथे स्वच्छता मोहीम राबवतात, मराठवाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात, पर्यावरणाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी विक्रम मुडपे यांच्या पुढाकाराने वेळोवेळी सायकल यात्रा काढली जाते. हवा प्रदूषण टाळण्यासाठी कमी अंतरावरचा प्रवास हा ग्रुप सायकलनेच करतो.आजपर्यंत त्यांच्या वृक्षवल्ली ग्रुपने पर्यावरण संदेश देण्यासाठी देशाच्या विविध भागातून सायकल यात्रा काढल्या आहेत. चिंचवड ते गोवा पाचशे 50 किलोमीटर, चिंचवड ते हम्पी 575 किलोमीटर, चिंचवड ते तिरुपती अकराशे किलोमीटर, हिमाचल प्रदेशातील मनाली ते लडाखमधील लेह पर्यंत, कमी तापमान असतानाही 576 किलोमीटर , चिंचवड ते कन्याकुमारी सोळाशे किलोमीटर या सर्व मोहिमांची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार झाल्याबद्दल डॉ. अनिल भिकाने, अर्जुन गुडसूरकर, धनंजय गुडसूरकर, अजय गादेवार, विश्वनाथराव माळेवाडीकर, प्राध्यापक किरण दंडीमे, भरत नादरगे, विष्णुकांत नादरगे,व्ही एस कुलकर्णी इत्यादीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.