प्रा. बालाजी सूर्यवंशी यांना उत्कृष्ट रासेयो कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर

0
प्रा. बालाजी सूर्यवंशी यांना उत्कृष्ट रासेयो कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर

प्रा. बालाजी सूर्यवंशी यांना उत्कृष्ट रासेयो कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर

उदगीर (प्रतिनिधी): येथील शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बालाजी पांडुरंग सूर्यवंशी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तसे पत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी दिले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्या कार्यक्रमाधिकाऱ्यास त्याच्या अंगीकृत कामास प्रोत्साहन मिळावे व त्याच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव व्हावा या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.
प्राध्यापक सूर्यवंशी यांनी वृक्ष दान दत्तक अभियानाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये वृक्षारोपणाचे कार्य केले आहे. महाविद्यालयाच्या वतीने दत्तक घेण्यात आलेल्या मौजे बामणी येथील वृक्षारोपण कार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान, ग्रामसर्वे, जल नियोजन, मतदार जनजागरण, बौद्धिक व्याख्याने व विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केलेले आहे. विभागाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनाही त्यांनी प्रोत्साहन दिलेले आहे. त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या पुरस्काराबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव पांडुरंगराव शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाच्या वतीने प्र-प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, सिनेट सदस्य डॉ.विष्णू पवार, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ.संजय निटुरे, कार्यक्रमाधिकारी डॉ. अनंत टेकाळे, डॉ. सुरेश शिंदे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ भालेराव, प्रबंधक बालाजी पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *