आ. संजयजी बनसोडे यांच्या मंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे भरत चामले यांनी घातले उदागिर बाबा चरणी साकडे
उदगीर (प्रतिनिध) : उदगीरचे लोकप्रिय आमदार संजयजी बनसोडे पुन्हा एकदा मंत्री व्हावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, स्व रामचंद्र पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांनी उदगीर नगरीचे ग्रामदैवत उदागिरबाबा चरणी महापूजा व आरती करून साकडे घातले.यावेळी उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रमोदजी कुलकर्णी,रामकिशनजी नादरगे,साईनाथजी चीमेगावे,सुरेंद्रजी अकनगिरे, राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष बालाजी परगे, विजयकुमार येडले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशसचिव युवराज कांडगिरे, करण गायकवाड, वीरेंद्र नादरगे,प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.