गुणवंताच्या जिद्दीला आणि संघर्षाला सलाम कार्यक्रमांतर्गत गुणवंतांचा सत्कार
गुणवंताच्या जिद्दीला आणि संघर्षाला सलाम कार्यक्रमांतर्गत गुणवंतांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील मौजे कुमठा (खुर्द) ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुनील भाऊ केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले, आणि शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या सोबतच त्यांच्या आई-वडिलांचा ही सत्कार करण्यात आला. यामुळे गावातील इतर तरुण पिढींना याची प्रेरणा मिळेल, कष्टाने आणि मोठ्या जिद्दीने यशस्वी झालेल्या या तरुणांचा आपणही आदर्श घ्यावा. आपणही कष्ट करावे, अशी प्रेरणा मिळावी. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती सुनील केंद्रे यांनी याप्रसंगी दिली. तसेच हे यशस्वी गुणवंत नोकरीच्या निमित्ताने कुठे जरी गेले तरी, त्यांची नाळ आपल्या गावाशी जोडली जावी. अशी अपेक्षाही व्यक्त केली. स्पर्धा परीक्षा या यशस्वी जीवनाचा पाया ठरू लागल्या आहेत. सध्याचे जग हे स्पर्धेचे जग आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करावा आणि आत्मविश्वास बाळगावा. असे आवाहन युवा नेते सुनील भाऊ केंद्रे यांनी केले.याप्रसंगी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक अशोकराव गुरुजी, बालाजी केंद्रे गुरुजी, गंगाधर बिरादार गुरुजी, पुंडलिक केंद्रे, माधव बिरादार, पाशा सय्यद, सत्यवान फड, बालाजी घुगे आणि समस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या महेश दिगंबर जाधव, भाषा अनुवादक म्हणून नियुक्त झालेले कपिल विलास स्वामी, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लिपिक म्हणून नियुक्त झालेले माधव मनोहर केंद्रे यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे नियोजन अतुल केंद्रे आणि संतोष बोईनवाड यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन तुळशीदास जाधव यांनी केले. गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
