भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री मधुसूदन माधवराव जाधव यांची निवड
लातूर : भ्रष्टाचार निर्मूलन समिती मुख्य शाखा मीरा-भाईंदर ठाणे, महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रवींद्र द्विवेदी साहेबांच्या कृपाशीर्वादाने श्री मधुसूदन माधवराव जाधव राहणार लातूर यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तरी त्यांच्या नियुक्तीचे पत्र श्री आनंद लक्ष्मण वरवटे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले, तरी निवडी बद्दल swp चे संस्थापक अध्यक्ष श्री संजय चव्हाण सर, श्री बालाजी सूर्यवंशी सर, राष्ट्रीय खेळाडू श्री गणेश पौळ, राष्ट्रीय खेळाडू श्री प्रभाकर महाराज, श्री देवानंद जोगदंड सर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.