शिवाजी महाविद्यालयाची बिरादार नंदिनी विद्यापीठाच्या दुहेरी सुवर्णपदकाची मानकरी

0
शिवाजी महाविद्यालयाची बिरादार नंदिनी विद्यापीठाच्या दुहेरी सुवर्णपदकाची मानकरी

शिवाजी महाविद्यालयाची बिरादार नंदिनी विद्यापीठाच्या दुहेरी सुवर्णपदकाची मानकरी

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थिनी बिरादार नंदिनी वसंत हिने महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाच्या निकालाचा मानाचा तुरा दुहेरी सुवर्णपदक घेऊन रोवलेला आहे. बिरादार नंदिनीने वनस्पतीशास्त्र या विषयांमध्ये 900 पैकी 830 गुण घेऊन विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला व प्रोफेसर डॉ.डी.एल. रेड्डी यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुवर्णपदक प्राप्त केले. तर दुहेरी यश संपादन करत असताना तिने सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये 900 पैकी 830 गुण घेऊन मागील तीन वर्षात विद्यापीठातून सर्वोच्च गुण घेण्याचे रेकॉर्डही केलेले आहे. त्यासाठी तिला चंद्रशेखर सदाशिव आयथाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुवर्णपदक मिळालेले आहे. एकाच वेळी दोन सुवर्णपदक मिळवून तिने महाविद्यालयाचे नाव सर्व दूर केलेले आहे. तिला या यशासाठी विभाग प्रमुख डॉ.आर.पी. बिरादार, डॉ.एन.व्ही.चाटे,डॉ. डी.वी. पाटील, डॉ. एम. ऐ.पाटेकर,काशीमपुरे एस.एम, बी. जी. चिखले,जाधव गोंविद यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिसन मांजरे, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी.टी.शिंदे व सर्व कार्यकारिणी सदस्याने अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!