लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील बाळाराम बानापुरे यांचा सत्कार

0
लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील बाळाराम बानापुरे यांचा सत्कार

लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील बाळाराम बानापुरे यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक बाळाराम निवृत्ती बानापुरे यांचा संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या त्रैवार्षिक शिक्षण शिबिरात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे येथे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय अभ्यासक्रम,पाठ्यक्रम समितीमध्ये तज्ञ समिती सदस्य म्हणून अभ्यासक्रम,पाठ्यक्रम निर्मितीमध्ये चांगले योगदान देत असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलूरकर, कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य व विद्यासभा अध्यक्ष डॉ.जयंतजी जोशी यांच्या हस्ते शाल , सन्मानचिन्ह व भारत एकात्मता स्तोत्र सचित्र दर्शन पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे,स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, सर्व संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेचा नावलौकिक केल्याबद्दल अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!