शास्त्री प्राथमिक शाळेत मकर संक्रांत सण उत्साहात साजरा
शास्त्री प्राथमिक शाळेत मकर संक्रांत सण उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात मकर संक्रांति निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर,प्रमुख वक्त्या म्हणून सौ.मंजुषा पेन्सलवारबाई व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मंजुषा पेन्सलवार यांनी मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा धार्मिक सण आहे. या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन गोड गोड बोला असा संदेश दिला जातो,तसेच हा सण उंचावर जाऊन पतंग उडवण्याचा आहे. उंचावर गेल्यामुळे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळतो व आपले शरीर बलवान बनते.मकर संक्रांत हा सण एकमेकांना एकत्र येण्याचा स्वस्थ राहण्याचा संदेश देतो.
अश्या प्रकारे भोगी व मकर संक्रांतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी आज सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.आजपासूनदिवस हळूहळू वाढत जातो.एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला.अशी म्हण आपण ऐकतो.याचा अर्थ असा आहे की,सुख दु:खाच्या वेळी आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे.तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे.हिवाळ्यात खूप थंडी असते.तीळगूळ खाल्याने शरीराला ऊर्जा व उष्णता मिळते.आजच्या दिवशी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकमेकांशी गोड गोड व खरे बोलण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. सुत्रसंचलन तुकाराम पेद्दावाड यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
