मराठा शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर या मंडळाच्या अध्यक्षपदी देविदासराव औटे
मराठा शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर या मंडळाच्या अध्यक्षपदी देविदासराव औटे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील मराठा शिक्षण प्रसारक मंडळाची नूतन कार्यकारिण जाहीर करण्यात आली आहे.नूतन अध्यक्ष म्हणून देविदास तुकाराम औटे तर सचिवपदी श्री नवटक्के बाबुराव नागोराव यांची नुकतीच निवड करण्यात आली. मराठा शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित राजश्री शाहू विद्यालय उदगीर व विश्वनाथ चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर या दोन्ही शाळेच्या योग्य व्यवस्थापनासाठी संस्थेने नूतन कार्यकारणीची निवड केली आहे यामध्ये अध्यक्ष म्हणून देविदास तुकाराम औटे तर सचिवपदी नऊटक्के बाबुराव नागोराव यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल दोन्ही शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने नूतन अध्यक्ष, सचिव, व कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात आले. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
