विद्यापीठ नामांतर लढा भिमसैनिकांचे स्फूलींग चेतविणारा – डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी
विद्यापीठ नामांतर लढा भिमसैनिकांचे स्फूलींग चेतविणारा - डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा हा स्वाभिमानाचा,अस्मितेचा लढा होता या लढ्यात भिमसैनिकांनी दाखवलेले धैर्य आणी प्रसंगी जीवाचे बलीदान देवून दिलेला निकराचा लढा हा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा असून अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करणाऱ्यांसाठी हा लढा स्फूलींग चेतविणारा ठरला आहे असे प्रतिपादन युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
शहरातील शहिद गौतम वाघमारे चौक येथे विद्यापीठ नामविस्तार दिन व अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई नेते अरूणभाऊ वाघंबर,माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,पत्रकार भिमराव कांबळे,मासूम शेख,बालाजी कांबळे, शिवनाथ कांबळे,चाॅद सौदागर,जाबेर शेख, भैय्यासाहेब भालेराव,बाबूभाई शेख,किरण वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते निळाध्वज लावण्यात आला.तसेच सामूहिक त्री-शरण पंचशिलाचे पठण करण्यात आले.
पुढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,तब्बल सोळा वर्षाचा निकराचा लढा भिमसैनिकांनी देवून प्रसंगी जीवाचे बलीदान दिले तेंव्हा कूठे विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचा नांव देण्यात आले.सिम्बाॅल ऑफ नाॅलेज म्हणून गौरवीत व्यक्तीचे नांव विद्यापीठाला देण्यासाठी केवळ जातीचा अडसर होता हे वारंवार सिध्द झाले.यातून प्रस्थापितांची जातीय मानसिकता दिसून येते.पण आज देशभरात चार पाच डझन विद्यापीठ आणी संस्थांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नांव आहे.बाबासाहेबांच्या नावामूळे विद्यापीठांचा आणी संस्थांचा गौरव वाढला आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक स्वागताध्यक्ष दयानंदराव वाघमारे यांनी केले.तर आभार संविधान कदम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन बानाटे, आकाश पवार,संविधान कदम, आनंद सोनकांबळे, बाबासाहेब सोनकांबळे, रमाकांत कदम,प्रकाश वाघमारे,बालाजी वाघमारे, ऊत्तम रायभोळे, राजु गुळवे, अमोल मोरे, दिलीप सोनकांबळे, मिलिंद कदम, राहुल वाघमारे,रितेश रायभोळे, आकाश वाघमारे, बाॅस वाघमारे,निलेश लामतुरे, रोहन गायकवाड,जय गुळवे, यशवंत वाघमारे, अभय गायकवाड,रोहीत दहीकांबळे, निलेश रायभोळे, विशाल ससाने,स्वर्णकेत कांबळे आदींनी पुढाकार घेतला.
