तीर्थ ग्रामपंचायत येथे हळदी – कुंकूवाचा कार्यक्रम सुवासिनींना बेलाच्या वृक्षाचे वाण
तीर्थ ग्रामपंचायत येथे हळदी - कुंकूवाचा कार्यक्रम सुवासिनींना बेलाच्या वृक्षाचे वाण
अहमदपूर (गोविंद काळे) : मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सन मानला जातो. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अहमद्पुर तालुक्यातील तीर्थ ग्रामपंचायत येथे दिनांक १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशी सुवासिन महिलेला हळदी कुंकू लावून वाणाचे दान दिले जाते. त्याचप्रमाणे तीर्थ ग्रामपंचायत च्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करत सुहासिनींना बेलाच्या वृक्षाचे वाटप करण्यात आले. यावेळी ऋतुजा कृष्णा देवकत्ते, कौशल्य माणिक देवकते, स्नेहल पांचाळ,शकुंतला माने, नीलाबई माने, मुक्ताबाई देवकते,अश्विनी माने यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
