शिवाजी महाविद्यालयात खाशाबा जाधव यांची जयंती साजरी

0
शिवाजी महाविद्यालयात खाशाबा जाधव यांची जयंती साजरी

शिवाजी महाविद्यालयात खाशाबा जाधव यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयात ऑलिंपिक वीर दिवंगत खाशाबा जाधव यांची जयंती राज्य क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्यानिमित्ताने त्यांची जयंती महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ.रामकिशन मांजरे होते. त्यांनी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले.यावेळी खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा हेलसिंकी 1952 मध्ये पहिले क्रीडा प्रकारातील कुस्ती प्रकारातील पहिले कांस्यपदक पटकावून देशाच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी केली, असा त्यांच्या कार्याचा गौरव प्राचार्य डॉ.मांजरे यांनी केला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अभिवादन करून प्रतिमेस पुष्प अर्पण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.के.पाटील यांनी केले,तर आभार प्रा. गजानन माने यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!