महाराष्ट्र उदयगिरीत महिला कर्मचाऱ्यांना ग्रंथांचे वाण

0
महाराष्ट्र उदयगिरीत महिला कर्मचाऱ्यांना ग्रंथांचे वाण

महाराष्ट्र उदयगिरीत महिला कर्मचाऱ्यांना ग्रंथांचे वाण

उदगीर (एल.पी.उगीले) : मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने एक आगळावेगळा उपक्रम राबवत, महिला कर्मचाऱ्यांना ग्रंथांचे वाण देऊन त्यांचा सन्मान केला. या उपक्रमाचा उद्देश ज्ञानप्रसाराला चालना देणे आणि महिलांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन देणे हा होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांच्या हस्ते ग्रंथांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्राचार्यांनी ग्रंथ वाचनाचे महत्त्व स्पष्ट करत, ज्ञानार्जन हा सतत चालणारा प्रवास असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला महिला प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, ग्रंथ हीच संक्रांतीची सर्वोत्कृष्ट भेट असल्याचे मत व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!