वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सामूहिक वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळा

0
वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सामूहिक वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळा

वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सामूहिक वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळा

उमरगा (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम लोहारा तालुक्यात राबवत असताना श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वाचन कौशल्य कार्यशाळा या कार्यशाळेच उद्घाटन माजी मुख्याध्यापक आणि साहित्यिक कमलाकर भोसले यांच्या शुभ हस्ते आणि मार्गदर्शनाने झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त आणि वाचन संकल्प महाराष्ट्र या उपक्रमा अंतर्गत सामूहिक वाचन आणि वाचन कार्यशाळा असा संयुक्त उपक्रम घेण्यात आला. वाचन संस्कृती रुजली पाहिजे हे जरी खरे असले तरी कसं वाचावं, का वाचावं, आणि त्याचा उपयोग समाजाला कसा होईल. याविषयी वाचन कौशल्याच्या पंचसूत्राची मांडणी आपल्या मार्गदर्शनात भोसले यांनी केली. यावेळी ग्रंथालयातील अभ्यासक्रमा व्यतिरिक्त पुस्तकांची यादी नुसार प्राध्यापकांना एक एक पुस्तक सामूहिक वाचण्यासाठी देण्यात आले. दोन दिवसांनी या पुस्तकाच सार रुपी लेखन संकलित केली जाणार आहे.
दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या वाचन कौशल्य कार्यशाळेत प्रथम प्राध्यापकांसाठी वाचन कौशल्य कार्यशाळा घेण्यात आली आणि दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याच तसेच वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम शाळा आणि महाविद्यालय मध्ये पोहोचवण्यासाठी महाविद्यालयीन प्राध्यापकांची स्वतंत्र समिती गठित केली आहे. आणि त्यांचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही एस इंगळे, उपप्राचार्य डॉ. पी ए पिटले, उपप्राचार्य प्रा. जी. एस मोरे, पर्यवेक्षक प्रा. शैलेश महामुनी, प्रा. डॉ वसंत हिस्सल, प्रा. डी टी पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिटले यांनी तर सूत्रसंचालन डॉ एस एन मुछटे आणि आभार प्रदर्शन डॉ व्ही डी देवरकर यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!